MetaGurukul AppGranth Sangat · Knowledge Circle
उघडा
App Download Member Login
UPSC Foundation Program: नवीन batch साठी प्रवेश सुरू · 1:1 Counselling Session बुक करा

MetaGurukul · Flagship Program

UPSC Foundation Program

IAS चा प्रवास पदवीनंतर नाही, शाळेपासून सुरू होतो.

इयत्ता ६ वी पासून मुलांमध्ये UPSC साठी आवश्यक असलेला पाया घडवणारा mentorship-led program, जागरूकता, विचारशक्ती, communication, आत्मविश्वास आणि शिस्त. आठवड्यातून फक्त २–३ तास, शाळेच्या अभ्यासावर ताण न आणता.

  • 6th Standard Onwards
  • Weekend-preferred sessions
  • आठवड्यात २–३ तास
  • Live Online
  • मराठी + हिंदी
  • इयत्ता ६ वी पासून IAS च्या ध्येयापर्यंत

कुलदीप सरांसोबत ६० मिनिटांचं personal session · Online / Phone

UPSC ची तयारी नेमकी कधी सुरू होते?

बहुतेक पालकांना वाटतं, पदवीनंतर. पण UPSC मध्ये खरी कसोटी लागते ती जगाची जाण, विचार करण्याची पद्धत, लेखन आणि व्यक्तिमत्त्व यांची. हे गुण काही महिन्यांच्या coaching मध्ये तयार होत नाहीत. ते वर्षानुवर्षे घडतात.

JEE आणि NEET साठी foundation शाळेतूनच सुरू होतं. UPSC साठी ते अधिक गरजेचं आहे, कारण इथे तपासलं जातं ते संपूर्ण व्यक्तिमत्त्व.

  • शाळेची वर्षं ही सवयी लागण्याची सर्वात योग्य वेळ. वाचन, विचार आणि अभिव्यक्ती, लहानपणी लागलेल्या सवयी आयुष्यभर टिकतात.
  • लवकर सुरुवात म्हणजे दबाव नव्हे. उलट, हातात वेळ असल्याने पाया शांतपणे आणि मजबूत घडतो.
  • पालकांना दिशा मिळते. कधी, काय आणि कसं, याचा स्पष्ट roadmap.

IAS होवो वा न होवो, हा पाया कोणत्याही career मध्ये उपयोगी पडतो.

हे coaching नाही, हा पाया आहे.

हा program म्हणजे:

  • वयानुसार, हळूहळू जागरूकता आणि विचारशक्ती घडवणारा प्रवास
  • मुलांना जग समजून घ्यायला, प्रश्न विचारायला आणि स्वतःचे विचार मांडायला शिकवणारं mentorship
  • UPSC साठी लागणारे गुण, आत्तापासून, नैसर्गिकपणे

हा program म्हणजे नाही:

  • लहान वयात exam चं दडपण
  • syllabus पाठ करून घेणं
  • शाळेच्या अभ्यासाला पर्याय

हा program कोणासाठी?

विद्यार्थ्यांसाठी

  • इयत्ता ६ वी आणि पुढील विद्यार्थी
  • ज्यांना प्रश्न पडतात आणि जग जाणून घ्यायची इच्छा आहे
  • ज्यांचं प्रशासकीय सेवेचं स्वप्न आहे, किंवा जे अजून आपली दिशा शोधत आहेत

पालकांसाठी

  • जे मुलाला मार्क्सपलीकडचं काहीतरी देऊ इच्छितात
  • जे या प्रवासात मुलासोबत सहभागी व्हायला तयार आहेत

हा program कदाचित योग्य नाही, जर लगेच result किंवा rank ची अपेक्षा असेल, किंवा मुलाच्या इच्छेविरुद्ध त्याच्यावर दडपण आणायचं असेल.

तुमच्या मुलामध्ये काय घडतं

आयाममुलामध्ये काय घडतंपुढे UPSC मध्ये उपयोग
जाणीवइतिहास, भूगोल, समाज, अर्थव्यवस्था आणि चालू घडामोडींची समजGeneral Studies चा पाया
विचारविश्लेषण करणं, वेगवेगळ्या बाजू पाहणं, स्वतःचं मत तयार करणंMains ची उत्तरं आणि Essay
अभिव्यक्तीस्पष्ट लिहिणं आणि आत्मविश्वासाने बोलणंAnswer writing आणि Interview
संस्कारशिस्त, नैतिकता आणि मूल्यंEthics paper आणि व्यक्तिमत्त्व
जिज्ञासास्वतःहून वाचण्याची आणि शिकण्याची सवयदीर्घकालीन self-study

काय शिकवलं जातं

प्रत्येक विषय मुलाच्या इयत्तेनुसार आणि समजेनुसार शिकवला जातो, ६ वी चा विद्यार्थी आणि १० वी चा विद्यार्थी यांचा प्रवास वेगळा असतो.

ज्ञानाची क्षेत्रं

  • इतिहास व संस्कृती
  • भूगोल व पर्यावरण
  • राज्यघटना व शासनव्यवस्था
  • अर्थव्यवस्था
  • विज्ञान व तंत्रज्ञान
  • चालू घडामोडी
  • नीतिशास्त्र व मूल्यं

कौशल्यं

  • वाचन व वृत्तपत्र वाचन
  • लेखन
  • वक्तृत्व व communication
  • विचार व विश्लेषण
  • नेतृत्वगुण व व्यक्तिमत्त्व विकास

प्रवास टप्प्याटप्प्याने

  1. ओळख

    ६ वी – ८ वी

    जिज्ञासा, गोष्टी, वाचनाची सवय, जगाची ओळख

  2. समज

    ९ वी – १० वी

    संकल्पना, चालू घडामोडी, लेखन व चर्चा

  3. सखोलता

    ११ वी – १२ वी

    विश्लेषण, answer writing, व्यक्तिमत्त्व विकास

  4. ध्येय

    पदवी व पुढे

    UPSC ची सखोल तयारी, Prelims, Mains आणि Interview

एका आठवड्यात काय होतं

दर आठवड्याला live online sessions, शक्यतो weekend ला, एकूण २–३ तास. प्रत्येक session highly interactive असतो. मुलं फक्त ऐकत नाहीत, प्रश्न विचारतात, आपले विचार मांडतात आणि चर्चेत सहभागी होतात.

फक्त शिकवणं नाही, मार्गदर्शन

कुलदीप सर स्वतः शिकवतात, आणि त्यांच्यासोबत आहे अनुभवी faculty team.

Sessions online असल्याने वेगवेगळ्या भागांतील, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे विद्यार्थी एकत्र शिकतात. विविध विचार, अनुभव आणि दृष्टिकोन एकत्र आल्याने एकमेकांकडून शिकण्याचा अनुभव अधिक समृद्ध होतो, आणि UPSC साठी आवश्यक असलेली व्यापक दृष्टीही तयार होते.

Learning experience

  • माध्यम: Live Online
  • भाषा: मराठी + हिंदी
  • वेळ: Weekend-preferred, आठवड्यात २–३ तास

आपल्या भाषेत, मराठी आणि हिंदीतून, शिकल्यामुळे संकल्पना पाठ होत नाहीत, खोलवर समजतात.

पालक: या प्रवासातले सर्वात महत्त्वाचे partners

मूल घरात घडतं. म्हणूनच हा program पालकांना सोबत घेऊन चालतो.

  • सुरुवात: कुलदीप सरांसोबत 1:1 IAS Roadmap Session, तुमच्या मुलासाठी personalized दिशा (Recommended)
  • घरी काय करावं: मुलाच्या प्रवासाला घरातून कसं पाठबळ द्यावं, याबद्दल सोपं मार्गदर्शन
  • पालकांशी संवाद: कुलदीप सर वेळोवेळी पालकांशी संवाद साधतात. प्रत्यक्ष भेटींनाही (in-person meetings) आम्ही प्रोत्साहन देतो.
श्री. कुलदीप कोटंबे सर

तुमचे मार्गदर्शक

श्री. कुलदीप कोटंबे सर

संस्थापक, Excellence IAS Academy, पुणे · Veteran UPSC Trainer

शिक्षण: M.A. (इतिहास) · M.A. (तत्त्वज्ञान) · M.A. (मराठी साहित्य)

२० हून अधिक वर्षांचा UPSC मार्गदर्शनाचा अनुभव. YASHADA, BARTI आणि SIAC सारख्या शासकीय संस्थांमधून ७,०००+ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. तत्त्वज्ञान, इतिहास आणि साहित्याचे प्रगाढ अभ्यासक.

  • २०+ वर्षंUPSC मार्गदर्शन
  • ७,०००+विद्यार्थ्यांना अध्यापन
  • ३००+संस्थांमध्ये व्याख्याने
  • १०,०००+पुस्तकांचं वाचन
कुलदीप सर व्याख्यान देताना
शाळा-महाविद्यालयांमधील व्याख्यान
सरांबद्दल अधिक जाणून घ्या

प्रवेश कसा घ्यावा

तुम्ही थेट 1:1 IAS Roadmap Session बुक करू शकता. काही प्रश्न असतील तर आधी मोफत Counselling Call घ्या.

  1. Program details. तुमच्या मुलाच्या गरजेनुसार program आणि fees ची संपूर्ण माहिती.
  2. निर्णय तुमचा. Join करायचं की नाही, कोणताही दबाव नाही.
  3. प्रवेश आणि batch ची सुरुवात.

Roadmap Session घेणं बंधनकारक नाही, पण आम्ही ते आवर्जून recommend करतो, त्यातून तुमच्या मुलासाठी योग्य दिशा आणि program चा उपयोग स्पष्ट होतो.

1:1 IAS Roadmap Session

६० मिनिटे · Online / Phone · ₹199

कुलदीप सर प्रत्येक कुटुंबाशी वैयक्तिकरित्या बोलतात. ₹199 चं शुल्क हे session गांभीर्याने घेणाऱ्या पालकांसाठी वेळ राखून ठेवण्यासाठी आहे.

Session बुक करा (₹199)

पालकांचे अनुभव

  • कुलदीप सरांच्या sessions नंतर माझा मुलगा बातम्या फक्त पाहत नाही, त्यावर प्रश्न विचारतो. जेवताना आमच्या घरात आता वेगळ्याच विषयांवर चर्चा होतात.
    स्नेहा कुलकर्णीपालक, नाशिक · इयत्ता ७ वी
  • ६ वी त UPSC म्हणजे दडपण असेल अशी भीती होती. पण sessions इतके interactive आहेत की मुलगा स्वतः weekend ची वाट पाहतो.
    संदीप देशपांडेपालक, नागपूर · इयत्ता ६ वी
  • Roadmap Session मध्ये पहिल्यांदा स्पष्ट झालं की पुढची काही वर्षं नेमकं काय करायचं.
    प्रिया शिंदेपालक, छ. संभाजीनगर · इयत्ता ९ वी

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

६ वी त UPSC चा विचार खरंच करायचा का?

हो, पण exam म्हणून नाही, पाया म्हणून. UPSC साठी लागणारी जागरूकता, विचारशक्ती आणि वाचनाची सवय वर्षानुवर्षे घडते. या वयात सुरुवात केली तर ती दडपणाशिवाय, नैसर्गिकपणे घडते.

शालेय अभ्यासावर परिणाम होईल का?

नाही. Sessions शक्यतो weekend ला असतात आणि आठवड्यात एकूण २–३ तासच लागतात. उलट जागरूकता आणि वाचनाची सवय वाढल्यामुळे शाळेच्या अभ्यासालाही मदत होते.

माझ्या मुलाला पुढे UPSC नको वाटलं तर?

काहीच हरकत नाही. विचारशक्ती, communication, जगाची जाण आणि शिस्त, हे गुण कोणत्याही career मध्ये उपयोगी पडतात. हा पाया आयुष्यभराची शिदोरी आहे.

YouTube वर free content असताना हा program का?

माहिती सगळीकडे आहे, पण दिशा नाही. काय, कधी आणि कोणत्या क्रमाने शिकायचं, हे वयानुसार ठरवणं, live चर्चेतून विचारांना आव्हान देणं आणि अनुभवी मार्गदर्शकाने प्रगतीकडे लक्ष देणं, हे free content देऊ शकत नाही.

Program किती काळ चालतो?

हा दीर्घकालीन प्रवास आहे, इयत्ता ६ वी पासून IAS च्या ध्येयापर्यंत. मुलाच्या इयत्तेनुसार प्रत्येक टप्प्यावर शिकवण्याची पद्धत आणि लक्ष बदलतं.

Sessions कोण घेतात?

कुलदीप सर स्वतः, त्यांच्या अनुभवी faculty team सोबत.

Sessions कसे असतात?

Live, online आणि highly interactive, प्रश्न, चर्चा आणि सहभागावर भर. घरबसल्या सहभागी होता येतं.

Sessions कोणत्या भाषेत होतात?

मराठी आणि हिंदी.

Program ची fees किती आहे?

तुमच्या मुलाच्या इयत्तेनुसार आणि गरजेनुसार program ची संपूर्ण माहिती आणि fees Roadmap Session किंवा Counselling Call दरम्यान सांगितल्या जातात.

1:1 IAS Roadmap Session मध्ये काय होतं?

कुलदीप सर तुमच्या मुलाची सध्याची इयत्ता, आवड, background आणि तुमची अपेक्षा समजून घेतात. त्यानंतर personalized roadmap देतात, काय करायचं, कधी आणि कसं. Session ६० मिनिटांचं असतं.

Roadmap Session साठी ₹199 का?

कुलदीप सर प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक वेळ देतात. हे छोटं शुल्क गांभीर्याने येणाऱ्या पालकांसाठी तो वेळ राखून ठेवण्यासाठी आहे.

Program join करण्यापूर्वी Roadmap Session घेणं आवश्यक आहे का?

नाही, ते बंधनकारक नाही. पण आम्ही ते recommend करतो, कारण कुलदीप सरांसोबतच्या या ६० मिनिटांत तुमच्या मुलासाठी नेमकी कुठून सुरुवात करायची, हे स्पष्ट होतं.

Session नंतर program join करणं बंधनकारक आहे का?

अजिबात नाही. निर्णय पूर्णपणे तुमचा असेल.

तुमच्या मुलाचा IAS प्रवास एका संवादातून सुरू होतो.

कुलदीप सरांसोबत ६० मिनिटांच्या 1:1 Session मध्ये तुमच्या मुलासाठी personalized roadmap मिळवा.